लहानपणीची गोड आठवण ☺✒
आपण लहान असताना काही खेळ असायचे (वेगवेगळ्या ठिकाणी नावं वेगळी असतील पण स्वरूप तेच असायचं) .
सहज आज आठवत होतो , प्रत्येक आठवणीत त्याकाळातील मज्जा आठवायची . चेहऱ्यावर आल्हाद हसू फुटत होत.
आमच्याकडं शाळा सुटली कि गल्लीपातळीवर ऑलम्पिक भरायचं .
आज काही खेळ आठवतायत -

(१) लपाछपी / लपंडाव :
८-१० मित्रांचा गराडा असायचा . एकावर राज्य यायचा , बाकी सगळे लपायचे . एक एक असं करत सगळ्यांना शोधण्यात डिटेक्टिव्ह बनल्याचा भास व्हायचा . सगळ्यांना शोधण्यात यश आलं तर सर्वात प्रथम शोधल्यावर नवीन राज्य यायचा . नाहीतर " #धप्पा " . 🤓

(२) गोट्या :
हा तर सगळ्यात भारी आणि सगळ्यात खुन्नस वाला खेळ होता . कुणाचा अड्डा किती मोठा त्यावरून श्रीमंती किंवा प्लेयरची कला कळायची . यात गावपातळीवर खेळाच्या प्रकारात भिन्नता होती . आमच्या गल्लीतले गोट्या खेळातले काही आठवणीतले प्रकार म्हणजे ; ' ढूस , चावी ,शादी ,गल , रिंगण, ढांगा पाणी , वित - शॉट, राजा-राणी '. आणि या खेळातला सर्वात डेंजर क्षण म्हणजे " #लुटटींग "👹

(३) विटी-दांडू
हा जरासा स्किलवाला आणि पावर वाला खेळ होता .
साधारण एक - दीड फुटांचं एक मजबूत दांडकू आणि वित भर आकाराची दोन्ही बाजूने विशिष्ट आकार दिलेली विट्टी .
एक छोटासा खड्डा केला जायचा (आमच्याकडं त्याला गल म्हणायचे) . त्यावर विट्टी आडवी ठेवायची आणि समोरील उभ्या असलेल्या खेळाडूंच्या लांब कोलायची . त्याची कॅच घेतली तर तो आउट . नाहीतर जिथे विट्टी पडेल तिथून विरोधी खेळाडूने गलीवर आडव्या ठेवलेल्या दांडूला विट्टी भिरकावून मारण्याचा प्रयत्न करायचा . नेम बसला तर तो आऊट नाहीतर " #उडव_विट्टी_आन_मार_टोला "🤠
(४) चिरघोडी
हा खेळ मात्र तुमची सहनशीलता तपासायचा . समान समान खेळाडू वाटून घ्यायचे . ज्यांच्यावर राज्य आलाय त्यांनी एकापाठोपाठ एक असा वाकून उभा राहायचं . विरोधी टीम मधल्या पहिल्या खेळाडूने , अगदी धावत येऊन लांब उडी मारून शक्य तेवढ्या शेवटच्या खेळाडूच्या पाठीवर जाऊन बसने (पण पाय जमिनीवर टेकणार नाहीत याची काळजी घेऊनच बॅलेन्स करायचं) . असा एकामागे एक उड्या मारायचे . खालच्या टीम वाल्यांचे पेशन्स मजबूत असले पाहिजेत . वरील पैकी एकजरी प्लेयर जमिनीला स्पर्श करताना आढळला कि ती टीम बाद .
आणि खालच्यांचा जर दम सम्पला तर जोरात " #चिर्रर्रर्रर्र "म्हणून ओरडायचं . मग फुल्ल मॅच रिपिट .
🤠
(५) कुया (आंब्याची कोय - त्याचं अनेकवचन)
हा खेळ आम्ही गोट्या सारखाच खेळायचो . फक्त गोट्या ऐवजी कुया गोळा करायचो . यात पण 'शादी'हा प्रकार होता. मस्त मजबूत बघून एक कोय घ्यायची त्याला आम्ही ' अष्टल , हंटर,आट्टु ' म्हणायचो .डाव ठरायचा १०-१० कुयांचा . एकदम सगळ्या रिंगणात फेकायचो . मग कोणती कोय उडवू हे विरोधी खेळाडू सांगणार . तीच बरोबर नेम धरून उडवली कि झाली " #शादी " .🍑

आता असले खेळ कुठेच दिसत नाहीत . आता फक्त मोबाइल. गोट्यांचा पण खेळ प्लेस्टोर वर उपलब्ध झालाय हे बघून तर जास्तच वाईट वाटलं .
(अजून काही आठवत असतील तर कळवा - rups.515@gmail.com)
No comments:
Post a Comment