Tuesday, October 9, 2018

स्त्री - women - lady - girl

कोणीच आयुष्यात देव पहिला नाही पण देवापेक्षा नक्कीच वरचढ असलेल्या #स्त्री मध्ये देवपण हे ठासून भरलेल असत .
•एका अर्भकाला ९ महिने आपल्या पोटामध्ये वाढवणे; मांसाच्या गोळ्याला संस्कार देऊन , घासातला घास & श्वासातला श्वास देऊन त्या अर्भकाला छत्रपती शिवाजी महाराज बनवणे हे आमच्या "#माँसाहेब_जिजामाता" या #स्त्रीनेच केलं .
•असंख्य स्त्रीजमातींमध्ये शिक्षणाची गोडी भरवणे हे आमच्या वंदनीय "#सावित्रीबाई_फ़ुले" या #स्त्रीनेच केलं .
•गोर-गरीब, अनाथ-अपंगअशा लोकांना आपले समजून जो प्रेमाने त्यांची सेवा करितो. तोच खरा साधू-संत होय. असे तुकाराम महारांनी एका श्लोकांत म्हटले आहे. त्या दृष्टी कोनातून विचार केला तर "#मदर_टेरेसा" या #स्त्रीला खरोखच संत म्हणणे योग्य आहे.
•रस्त्यावर विव्हळत कोणी पडलं तर दुर्लक्ष करणारी आपली जमात पण याच अनाथांना , गोरगरिबांना मायेची उब देऊन जगण्याची नवीन दिशा देण्याचं काम आमच्या अनाथांची माय "#सिंधुताई_सपकाळ_माई" या #स्त्रीनेच केलं .
•स्त्रीने फक्त चूल - मूल याच चक्रामध्ये अडकून पडू नये तर उंचच उंच आकाशाला गवसणी घालावी आणि आंतरिक्षामध्ये झेप घ्यावी हि उम्मेद आमच्या "#कल्पना_चावला" या #स्त्रीनेच निर्माण केली .
•जागतिक स्तरावर भारतासारख्या बहुप्रचन्ड देशाचं यशस्वी प्रतिनिधित्व आमच्या "#इंदिरा_गांधीं" या #स्त्रीनेच केलं .
•आजच्या आपल्या ऍडव्हान्स लाईफ स्टाईल नावाच्या भ्रमामध्ये तोच जुना गोडवा टिकवून ठेवण्याचं काम आपली "#आज्जी_आई " म्हणजे #स्त्रीच करते .
अशे कित्येक उदाहरणे आहेत . 
मी हे जे काही लिहिल आहे , याची प्रेरणा सुद्धा माजी "#आज्जी"म्हणजे #स्त्रीच आहे .
समस्त स्त्री शक्तीला _/\_ मुजरा🙏 

rups.515@gmail.com

No comments:

Post a Comment