कधीकाळी माझं स्वप्न होत . प्रत्यक्षात इथं कधीतरी यायचं हे ठरवलं होतं . पण कॉलेज मध्ये असताना कधीच गोव्याचा प्लॅन यशस्वी झाला नाही .
जॉब मुळे येणं झालंच शेवटी . आलो , इथं राहिलो , इथं रमलो , इकडच्या निसर्गाच्या अगदी प्रेमात पडलो . इकडचा समुद्रकिनारा , इथले धबधबे , इकडची मंदिरं , इकडची वेगळीच घरं (बांधकामाची शैली) अश्या अनेक गोष्टींमध्ये मन अगदी रमून गेलं .
लग्नानंतर नवीन जोडपं ४ - ५ दिवसांसाठी गोव्याला येतं ; मी मात्र सहपरिवार २ वर्ष इकडं राहिलो (लग्नानंतरची २ वर्षे) .
#आज_एवढ्या_वर्षानंतर_गोवा_सोडतोय ☹
संमिश्र भावना आहे . आपल्या प्रदेशात येतोय म्हणून आनंद आहे 😊& गोवा सोडतोय म्हणून डोळ्यात पाणी आहे 😢

एवढ्या दिवसात खूप छान छान अनुभव आले .
गोव्याची संस्कृती एकदम आगळी वेगळी पण भिन्नतेत एकता म्हणतात ना ते तशी .
देश्याच्या नकाशात इवलुसा छोटासा प्रदेश - गोवा .
माणसेही तेव्हडीच प्रेमळ जेव्हडी इथली शहाळी .
आजतागायत आपल्याकडं जशी चौकाचौकात होणारी भांडणं इकडं कधी पाहायला मिळाली नाहीत .

आरे आज खूप बोर होतंय किंवा कंटाळा आलाय असं म्हणणं म्हणजे आमच्यासाठी एक निमित्त असायचं बाहेर फिरायला जाण्यासाठी .
(तसं बघितलं तर आम्ही निमित्ताची वाट कधीच बघत नव्हतो)

ते निळेशार अथांग पसरलेले समुद्रकिनारे , त्या मस्त हिरव्यागार नारळाच्या आणि सुपारीच्या बागा , दूधसागर धबधब्याचे ते विहंगम दृश्य , नेत्रावली धबधब्याची बिकट पण काटक वाट , बोण्डला अभयारण्यातील अगदी जवळून पाहिलेले प्राणी , ५ - ५ किलोमीटर कधीकधी रस्त्यावर एकटाच असायचो तो ड्रायविंग चा थरार , जंगलामधून निघणाऱ्या वाटा , आग्वाद आणि काब्देराम किल्ल्याची भटकंती , तांबडी-सुर्ला चे ऐतिहासिक दृश्य , मंगेशी -नागेशी -शांतादुर्गा यांचे भव्य आणि वेगळ्या शैलीचे टापटीप मंदिरं , ओल्डगोव्याचा तो फेमस चर्च , रात्री कधीही भूक लागली तर KTC ला जाऊन परशुरामाच्या गाड्यावर मारलेला ताव , धोधो पावसात रेनकोट घालून काम करण्याची वेगळीच मज्जा , ट्राफिक पोलिसांच्या जागा ठरलेल्या होत्या तर त्यांना बघून आडवाटेला पळणे , विजयश्री मधला चहा आणि बन्स , फेब्रुवारी मधला फेमस " व्हिवा कार्निव्हल " , तसेच " शिगमोत्सव " यांची वेगळीच मज्जा .
या सगळ्या व अश्या अनेक आठवणी मनात घेऊन जातोय आज .
इकडची माणसं म्हणजे एकदम " #सुशेगात " 😊
इकडं घरांच्या भिंती जश्या कलरफुल असतात तशीच माणसंही एकदम दिलखुलास .
आज घरातील सामान पॅकिंग करताना बिल्डिंग मधली सगळी लोकं मदत करायला आपणहून आली .
जाताना " आमची आठवण ठेवा " असा प्रेमानं बोलली . डोळ्यात पाणीच आलं टच्कन .
इकडं अगदी जिवाभावाची मित्र कम्पनी मिळाली .
रूमवर असतानापासून माज्या भावाप्रमाणे सोबत असलेला #Nagraj Gore, Shoyeb Shaikh, Sandeep Damare, Devendra Suryawanshi, Abhijit Sawant असे एक ना अनेक कित्येक माणसं मिळाली .
भावांनो मी तुम्हाला नक्कीच खूप मिस करेन . माज्या मनातली तुमची जागा आयुष्यभर कायम राहील .
परत कधी गोव्याला यायला जमेल का नाही सांगता येणार नाही . पण संधी मिळालीच तर १००% येणार .

आज जाताजाता एवढच बोलेन " #देव_बरे_करो "
rrups.515@gmail.com
No comments:
Post a Comment