भाऊ तुज आडनाव काय ? मी बोललो ****** , का ओ असं का विचारलंत ? नाही ****** म्हणजे तुम्ही *** जातीचे ना ?
मला समजलंच नाही क्षणभर . मग क्लिक झालं .

जरा फ्लॅशबॅक मध्ये जातो .
लहानपणी शाळेत एकत्र डब्बा खाताना ; पाहिजे त्याच्या डब्ब्यात हाथ घालायचो . त्यात कधीच "भगवा - हिरवा - निळा - पिवळा" रंग दिसला नव्हता .

एकाकडे वाटाण्याची झणझणीत उसळ असायची , कोणाकडे ठरलेलीच बटाट्याची भाजी तर शेपू - मेथी एकाच्या डब्ब्यात असायची . शाळेतल्या मैदानात एक हाथगाडा वजा " फूड मॉल " असायचा . तिथले भडंग खाताना कधीच त्याचा कलर नाही पहिला .
खेळायचो एकत्र , बागडायचो एकत्र पण कधीच जातपात पडताळत बसण्याच्या भानगडीत पडलो नव्हतो .
#जात_बघून_मैत्री_करण्याची_दळभद्री_शिकवण_कधीच_आपल्या_घरातून_मिळत_नव्हती_आणि_नाही 😡
मग आज हे विष कोण पेरतंय ? का आज जातीवरून हिणवलं जातंय ? तेच एकत्र डब्बा खाणारे आज रंगाच्या आणि आडनावाच्या भेदाभेदीत का तोलतायत एकमेकांना ? 😡
साधा प्रश्न , समजा आपण आजारी पडलो किंवा आपल्या जवळच कोणी आजारी पडलं आणि इमर्जन्सी मध्ये दवाखान्यात जावं लागलं ; तर डॉक्टर ची जात - धर्म पाहणार आणि मग ट्रीटमेंट घ्यायची का नाही असं ठरवणार का आपण ? मग इतर वेळेसच का ?😢
आपल्याला जाती धर्माच्या नावाने भांडवत त्यावर राजकारण केलं जात . हे साधं गणित आपल्याला कधी समजणार .
जातींवरून समाजसुधारकांना आणि महापुरुषांना पण वाटून घेतलंय आपण किंबहुना आपल्याकडून करवून घेतलं जातंय .
यांसारख्या गोष्टींवरती तर सगळं राजकारण शिजत .
आज सगळ्या जाती धर्मातील बेरोजगारांनी आपल्याला रोजगार कसा मिळवता येईल यांसारख्या विषयावर एकत्र येणं गरजेचे आहे . पण आपण एकत्र कशासाठी येतो ; तर दुसऱ्या जातीला किंवा धर्माला खाली कस पाडता येईल आणि त्यावर आपल्या राजकारणाची पोळी भाजता येईल अश्या दरिद्री मानसुब्याला मदत करण्यासाठी . हेच सर्वात मोठं दुर्दैव आहे आपलं .

एकदा फक्त सगळेजण एकत्र या ; जात धर्म सोडून एकत्र येऊ ..हेच राजकारण करणारे शेपूट गुंडाळून बसतील .
ज्याच्या डब्यातील जेवणाला भारी टेस्ट असायची आज त्याची टेस्ट आपण आडनाव किंवा जात पडताळून करतोय . खूप खाली जातोय आपण .
अगदी रसातळाला जाऊ ; अश्याच वागण्याने .
अगदी रसातळाला जाऊ ; अश्याच वागण्याने .
सर्वात प्रथम बेरोजगारी नष्ट करण्याकरता सर्वानी एकत्र येणे आणि आपल्या उदरनिर्वाहाची सोय करणे हि काळाची आणि कळकळीची गरज आहे . _/\_
✍
rups.515@gmail.com
No comments:
Post a Comment